महाड अर्बन बँकेचा इतिहास


महाड हे शहर पूर्वी व्यापारी बंदर म्हणून प्रसिद्ध होते. श्री. वीरेश्वर देवस्थान परिसरात मोठ्या प्रमाणावर व्यापार होत असे. त्या काळी खासगी सावकारांकडून अर्थपुरवठा केला जात असे आणि बँकांची संख्या अत्यल्प होती.

लोकांना स्वतःची आर्थिक संस्था असावी अशी जाणीव होत गेली आणि त्यातूनच महाड अर्बन बँकेची ३ जानेवारी १९३१ रोजी स्थापना करण्यात आली. कै. गोविंद चिं. भाटे यांनी चीफ प्रमोटर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.

चेअरमन (कालावधी)

  • कै. बाळकृष्ण बल्लाळ जोशी — १९३१ ते १९३४
  • कै. महादेव ब. वीरकर — १९३४ ते १९४०
  • कै. दत्तात्रेय नरहरी वैद्य — १९४० ते १९६६
  • कै. मोहन सुंदर मेहता — १९६६ ते १९६८
  • कै. बाळकृष्ण रामचंद्र वाडकर — १९६८
  • अॅड. सुधाकर शंकर सावंत — १९६९ ते १९९४ व १९९९–२००५
  • श्रीमती शोभा सुधाकर सावंत — १९९४–९९ व २००५ पासून पुढे

बँकेच्या विकासात कै. वैद्य व अॅड. सावंत यांचे योगदान अतिशय उल्लेखनीय असून त्यांच्या कार्यकाळात शाखा, ठेवी व कर्जवाढ मोठ्या प्रमाणात झाली.

ऑपरेटिव्ह अर्बन बॅंक महाड लिमिटेड — रजि. नं. ६९४२ (३-०१-१९३१)
आरबीआय लायसन्स नं. MH 418 (१०-०१-१९८५)